Ad will apear here
Next
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
वेळापूर (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे असलेल्या इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष १९९०-९१ मध्ये दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा होता. 

१९९०-९१ या शैक्षणिक वर्षात इंग्लिश स्कूलमधील दहावीत असणारे जवळपास ७२ माजी विद्यार्थी आपल्या कुटुंबासहित यावेळी उपस्थित होते. यातील प्रत्येकाने आपापल्या आठवणींना उजाळा दिला. शाळेच्या संयोजन समितीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तीन दिवंगत झालेल्या माजी विद्यार्थ्यांना यावेळी श्रद्धांजलीही वाहण्यात आली. 

विशेष म्हणजे या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी त्यांची एक समिती तयार केली. त्यामार्फत जमा होणारा निधी हा शाळेसाठी आणि शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिला जाणार आहे. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत मेलगे यांच्यासह रामचंद्र पाचपुंड, सुरेश होडगे, यादव, पवार यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनीही यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश पिसे मंगेश सोनार, हैबतराव माने, रईस मुलांणी, आनंद गायकवाड, सुनील मुंगुसकर, विजय कोळेकर, संजय बनकर, मोहन देवकते, संजय जाधव, रशीद मुलाणी, पल्लवी होडगे, अवंतिका मगर, राधिका बाबर व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZJMBC
 आठवण शाळेची , साठवण मैत्रीची... मला देखील शाळेची आठवण झाली. मस्त बातमी.
Similar Posts
राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी रामजी कश्यपची निवड वेळापूर (सोलापूर) : औरंगाबाद येथे ७ मे रोजी झालेल्या खो खो निवड चाचणीत वेळापूर येथील इंग्लिश स्कुल वेळापूर शाळेतील रामजी हरीचंद्र कश्यप याची १४ वर्ष खालील खो खो संघात निवड झाली आहे.
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ सोलापूर : ‘शासनाच्या सूचनेनुसारच सोलापूर महापालिकेच्या सर्व गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणीच्या ठिकाणी लवकरच स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘आम्ही संपात आहोत; पण शेतीमालाची नासाडी पटत नाही’ पंढरपूर : संप किंवा बंद म्हटले, की खळ्ळ-खटॅक ठरलेलेच; मात्र सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक या गावात कोणत्याही शेतमालाची नासाडी न करता शेतकऱ्यांच्या संपाचा पहिला दिवस पार पडला. हे शेतकरी संपात सहभागी असले, तरी होता होईल तो शेतीमालाची नासाडी करायची नाही, असा सारासार विचार त्यांनी केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language